Organised By: SNDT Women’s University | PVDT College Of Education for Women
Date :February 28, 2023
पी व्ही डी टी कॉलेज ऑफ एज्युकेशन फॉर वूमन एस एन डी डी महिला विद्यापीठ दि २८-२-२३ रोजी येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस दिमाखात साजरा करण्यात आला. ह्या दिवसाचं अवचित्य साधून कॉलेज मध्ये एका नाविन्यपुर्ण विज्ञाननिष्ट कार्यक्रमाचं सादरीकरण विज्ञान मंडळाद्वारे करण्यात आले होरे कार्यक्रम साजरा करण्यासाठी प्रथम वर्ष बी.एड.च्या विद्यार्थिनींनी विशेष प्रयत्न केले प्रोफेसर डॉ. सिद्धार्थ घाटविसावे सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुभाष वाघमारे सरांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.ह्या कार्यक्रमात इतर शिक्षकवृंद आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनिंनी सहर्ष उपस्थिती दर्शवली आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. ह्या कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने झाली. विद्यापीठ गीतानंतर सुंदर स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. ह्या कार्यक्रमात विज्ञान आणि अंधश्रद्धा हे नाटक सादर करून सेल्फ अवेरनेस निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला .काही विद्यार्थीनिंनी कवीता, भाषण आणि विज्ञान ,काल आज आणि उद्या या विषयावर प्रस्तुतिकरन सादर करण्यात आले. ह्या कार्यक्रमात मॅजिक शो आणि क्विझ स्पर्धा मध्ये ही उपस्थित विद्यार्थिनिंनी सहभाग घेतला. आणि विजेत्या विद्यार्थिनिंना बक्षीस हि देण्यात आले. कार्यक्रमात उल्हसाचं आणि आनंदाचं वातावरण होतं. कार्यक्रमाची सांगता डॉ सिद्धार्थ घाटविसावे यांच्या विज्ञान निष्ठा का महत्वाची आहे या विषयावरील मार्गदर्शनाने व प्रमुख पाहुण्याच्या भाषणाने झाली.शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रम संपला ।