Reaccredited by NAAC,

Awarded ‘A’ Grade

Reaccredited by NAAC, Awarded ‘A’ Grade

Event Name: Inauguration of Maharshi Karve Mahila Sakshamikaran Dnyansankul, Chandrapur
Organised By: श्री. ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई | महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर
Date :Jun 10, 2023 - 6.30 PM onwards

एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचे महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर येथील विविध अभ्यासक्रमांचा शुभारंभ दिनांक १० जून, २०२३ रोजी सायंकाळी ६.३० वाजता मा.ना.श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार, मंत्री, वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय म. रा. तथा पालकमंत्री चंद्रपूर यांच्या शुभहस्ते पार पडला.

मा.ना.श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब, मंत्री, वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय तथा पालकमंत्री चंद्रपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत व माननीय कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव मॅडम यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या आजच्या कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील काना कोपऱ्यातून हजारो महिला/मुली कार्यक्रमासाठी आल्या होत्या.

यावेळी कार्यक्रमात कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव, प्र – कुलगुरू डॉ. रुबी ओझा, जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा जी सी, माजी अध्यक्ष, वनविकास महामंडळ म.रा. श्री. चंदनसिंह चंदेल, माजी नगराध्यक्ष बल्लारपूर शहर श्री. हरिष शर्मा, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ श्री. अ.शं.गाडेगोने, उपविभागीय अधिकारी, बल्लारपूर डॉ. दीप्ती सूर्यवंशी, मुख्याधिकारी, नगरपरिषद बल्लारपूर श्री. विशाल वाघ,कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. नितीन प्रभूतेंडोलकर, सहायक कुलसचिव डॉ. बाळू राठोड उपस्थित होते.

wpChatIcon
wpChatIcon