एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या भारतरत्न महर्षी कर्वे ज्ञान स्त्रोत केंद्रातर्फे “ग्रंथोत्सव – 2023” चे आयोजन.
दिनांक ६-७ फेब्रुवारी २०२३ रोजी चर्चगेट येथील भारतरत्न महर्षी कर्वे ज्ञान स्रोत केंद्र येथे “ग्रंथोत्सव २०२३” चे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी कार्यक्रमाचे उदघाटन कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि वित्त व लेखाधिकारी श्री. विकास देसाई यांचे हस्ते होणार आहे.
दुसऱ्या दिवशी “विद्यार्थीदशेतील श्री. विश्वास नांगरे पाटील” (अति. पोलीस महासंचालक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग) हा विषय घेऊन श्री. विश्वास नांगरे पाटील यांची प्रकट मुलाखत लेखक डॉ. अमेय प्रदीप देसाई हे घेणार आहेत. तसेच या प्रसंगी उद्योजक श्री. मिलिंद धोंड हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय कुलगुरु डॉ. उज्वला चक्रदेव भूषवतील.
सदर कार्यक्रम पाटकर हॉल, चर्चगेट येथे होणार आहे.
या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन भारतरत्न महर्षी कर्वे ज्ञान स्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. सुभाष चव्हाण यांनी केले आहे.